गोरेगाव, गोंदिया | प्रतिनिधी — चंद्रसेन येळे
गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाइन गटांची ई-पीक पाहणी पूर्ण होत नसल्याने निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत आज गोरेगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
गोरेगाव तालुक्यातील अनेक शेतजमिनींच्या ऑनलाइन गटांची ई-पीक पाहणी सध्या पूर्ण होत नसल्यामुळे पीक नोंदणीचे काम प्रलंबित राहत आहे. परिणामी शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजना, पीक कर्ज, पीक विमा आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची ही महत्त्वपूर्ण समस्या लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरळीत करावी आणि प्रलंबित पीक नोंदणी पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी जनतेचा कार्यकर्ता दुर्गाप्रसाद ठाकरे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोंदिया यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
📍 स्थळ : गोरेगाव, जिल्हा गोंदिया
🎙️ रिपोर्टर : चंद्रसेन येळे
📺 NEWS NATION 81
