गोंदिया, दि. २१ जून २०२६ — जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया आणि जिल्हा बार असोसिएशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज मल्टीपरपज हॉल, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी मा. श्री. आर. जी. वाघमारे (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश), श्री. ए. एस. प्रतिनिधी (जिल्हा न्यायाधीश-१), श्री. के. एन. गौतम (जिल्हा न्यायाधीश-३), श्री. ए. सी. खुराना (जिल्हा न्यायाधीश-४), श्री. डी. व्ही. हरणे (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), श्री. व्ही. एच. शेंडे (सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), श्री. एन. के. वाळके (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), अॅड. एस. आर. बोरकर (अध्यक्ष, बार असोसिएशन), अॅड. मंजुलता चतुर्वेदी (उपाध्यक्ष) व अॅड. नीना दुबे (सचिव) यांच्यासह न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील, पॅनल लॉयर्स, लोकअभिरक्षक आणि पी.एल.व्ही. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मा. वाघमारे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देत योग हा निरोगी जीवनाचा पाया असून तो नियमित जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन केले.
योग शिबिरात योग प्रशिक्षक श्रीमती तृप्ती ज्योतसिंह ग्रेवाल, श्रीमती नलिनी जाधव आणि श्री सुखमंत ज्योतसिंह ग्रेवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वृक्षासन, त्रिकोणासन, कटिचक्रासन, मार्जरीआसन, उष्ट्रासन, बालासन, भुजंगासन, शवासन, ताडासन, वज्रासन, अर्ध मत्स्येंद्रासन यांसारखी विविध योगासने तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी, भस्त्रिका, उज्जायी आणि शीतली या प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू व हाडे बळकट होतात, तसेच तणाव, चिंता, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. "जो करता है योग, उसे नहीं छूता कोई रोग" असा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी अॅड. नीना दुबे यांनी आभार प्रदर्शन केले. सुमारे ८० ते १०० उपस्थितांच्या सहभागात हा योग शिबिर कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचारी व पी.एल.व्ही. यांनी सहकार्य केले.
*सऺवाददाता*
मुमताज अली सैय्यद
जिला गोदिया
