महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया द्वारे आयोजित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) द्वारे प्रायोजित शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, फुलचूर पेठ गोंदिया येथे "Cloud Computing Services & System Administration" या विषयावर आयोजित नि:शुल्क 60 दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रम दि. 11 मार्च ते 21 मे 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे समारोप आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ दि.19 मे 2026 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला एच.आर. वाघमारे, राज्य समन्वयक बार्टी, विभागीय अधिकारी, एम.सी.ई.डी. नागपूर तथा केंद्रप्रमुख हिंगणा सेंटर, एम.सी.ई.डी. नागपूर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांचेद्वारे श्री हृदय गोडबोले, प्रकल्प अधिकारी, बार्टी-नागपूर आणि रोशन तायवाडे, प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. गोंदिया, वैभव टाकळे जिल्हा प्रकल्प समन्वयक गडचिरोली, शिशुपाल मानकर, कार्यालयीन सहाय्यक एम.सी.ई.डी. गोंदिया, चंद्रशेखर मेश्राम, कार्यक्रम समन्वयक, एम.सी.ई.डी. गोंदिया उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया (MCED) यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘क्लाउड कम्प्युटिंग व सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन’ हे भविष्यातील अत्यंत महत्वाचे क्षेत्र असून, सातत्यपूर्ण सराव व कौशल्य विकास यामुळे उज्ज्वल करिअर घडवता येते. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना Cloud Computing System Administration क्षेत्रातील प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थांकडून सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
*सऺवाददाता*
मुमताज अली सैय्यद
गोदिया
