Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

७ वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप , गोंदिया न्यायालयाचा कडक निकाल; अभियोजनाच्या भक्कम मांडणीची दखल....................



गोंदिया येथील ७ वर्षांच्या निरागस बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा 

 विशेष न्यायालयाने आरोपी लक्ष्मण उर्फ मुका, इसरू ब्रम्हणकर यास जन्मठेपसह सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय आरोपीवर २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.


विशेष न्यायाधीश (पॉक्सो) तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी आरोपीला पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत कलम 6 अन्वये आणि भारतीय दंड संहिता कलम 376(AB) अंतर्गतही दोषी ठरवण्यात आले असले, तरी पॉक्सो कायद्याच्या कलम 42 नुसार स्वतंत्र शिक्षा देण्यात आलेली नाही.


या खटल्यात राज्याच्यावतीने एकूण ११ अभियोजन साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मूकबधिर शाळेतील विशेष शिक्षकाचाही समावेश होता. आरोपीने बचाव पक्षाचा एक साक्षीदार सादर केला होता; मात्र अभियोजन पक्षाने त्याची सखोल उलटतपासणी करून महत्त्वपूर्ण बाबी न्यायालयासमोर मांडल्या. निकाल देताना न्यायालयाने या बाबींची स्पष्ट दखल घेतली.

तपास व खटल्यादरम्यान आरोपीने भोगलेला कारावासाचा कालावधी शिक्षेतून वजा करण्यात येणार आहे. तसेच प्रकरणातील कपडे व मेमरी कार्ड यासारखी मालमत्ता अपीलची मुदत संपल्यानंतर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम अपीलची मुदत संपल्यानंतर पीडितेला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांना पीडितेच्या पुनर्वसनासाठी नुकसानभरपाई निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले असून, ही रक्कम राज्य शासनाच्या ‘पीडित नुकसानभरपाई योजने’तून देण्यात येणार आहे.

हा खटला गोंदिया जिल्ह्यासाठी सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता सतीश यू. घोडे यांनी प्रभावीपणे चालविला.


या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणांत कठोर शिक्षा देण्याचा न्यायालयाचा ठाम संदेश समाजापुढे पुन्हा अधोरेखित झाला आहे.


   संवाददाता 

राजकुमार राऊत

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes