Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

भारतीय जनता पार्टी च्या BLA2 प्रशिक्षणाची बैठक संपन्न.............NN81


   

 मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील निंबा जिल्हा, मुंडी पार  जिल्हा परिषद, व घोटी जिल्हा परिषद क्षेत्रातील BLA2 च्या प्रशिक्षण वर्गाचे आणि कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन श्री सूर्या मांडोदेवी येथे  दिनांक 26 जून 2026 ला आयोजित करण्यात आले. 

 बैठक सौ सीताताई रांगलाले भाजपा जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेत, माजी आमदार माननीय हेमंत भाऊजी पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच  SIR मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख श्री. जे. डी जगनित गुरुजी, डॉक्टर लक्ष्मणजी भगत बांधकाम सभापती जि प गोंदिया,

 गिरधारीजी बघेले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव, श्रीमती कतलाम ताई जिल्हा परिषद सदस्य घोटी, शशिकला ताराम पंचायत समिती सदस्य,

 कुशन जी घासले माजी सभापती,

 विश्वजीत जी डोंगरे जिल्हाध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा, मनोज जी बोपचे मा.सभापती, खु मेन्द्रजी मेंढे मा.जि प सदस्य, संजय जी बरेवार जिल्हा उपाध्यक्ष, डॉक्टर किशोरजी गौतम मा.सभापती, दु लीचंद भाऊजी बघेले मा. सभापती, झुमक भाऊजी बीसेन मा. उपसभापती, बालू भाऊ पटले महामंत्री गोरेगाव मंडळ, सर्व शक्ती केंद्रप्रमुख पंचायत समिती प्रमुख जिल्हा परिषद प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सीता ताई राहंडाले यांनी संघटनात्मक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले तर माजी आमदार हेमंत भाऊ पटले यांनी पक्ष संघटन मजबूत करणे हा कार्यकर्त्याचा ध्येय असला पाहिजे असे उद्देशून म्हटले.

 विधानसभेचे एस.आय.आर चे मोरगाव अर्जुनी विधानसभेचे  प्रमुख श्री. जें.डी.जगनित गुरुजी यांनी नवीन मतदारांच्या नोंदी तसेच तीस तारखे नंतर मॅपिंग चे फॉर्म भरण्याची मोहीम यशस्वीपणे राबवून प्रत्येक बुतवर मतदार वाढविण्याचा सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा तसेच एसआर संबंधाची सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. उपस्थित सर्व बी एल ए टू ला  प्रशिक्षण देण्यात आले.

 गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विनोद जी अग्रवाल यांनी सुद्धा या प्रशिक्षणाला भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

 सूत्रसंचालन तालुका महामंत्री श्री काशिनाथ भंडारकर यांनी केले.

 याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचा सहभोजनाची व्यवस्था होती सगळ्यांनी आनंदाने एकत्र होऊन सहभोजनाचा आस्वाद घेतला.


रिपोटर:- चंद्रसेन येळे न्यूज़ नेशन 81।

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes