Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

पल्स पोलिओ, नियमित लसीकरण व गाभा समितीबाबत, जिल्हा टास्क फोर्स समिती सभा संपन्न...NN81


जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आणि विविध राष्ट्रीय आरोग्य मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली दि.22 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा टास्क फोर्स (DTF) समितीची बैठक पार पडली.

           या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

          बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी संबंधितांना आवश्यक निर्देश दिले.

          *गाभा समितीबाबत आढावा :* बैठकीत जिल्हा गाभा समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य सुधारणे, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे, सॅम-मॅम बालकांचे वजन वाढविणे, कुपोषण आणि आरोग्य सेवांमधील तांत्रिक व व्यावहारीक त्रुटी तातडीने दूर करणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

           *राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम :* राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गावोगावी नियमित लसीकरणाचे सेवासत्र आयोजित करावे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. विशेषतः दुर्गम, आदिवासी आणि संवेदनशील भागातील बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

           *पल्स पोलिओ मोहीम (28 जून) :* आगामी 28 जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पुर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मोहिमेच्या दिवशी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बस स्थानके, रेल्वे स्टेशन. विटा भट्टी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी विशेष बुथ तयार करावेत, तसेच फिरत्या पथकांची स्थापना करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात 94089 बालके विशेषत: 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांसाठी 1473 बुथचे नियोजन करण्यात आले असुन 2967 आरोग्य कर्मचारी व 265 पर्यवेक्षकांच्या मदतीने पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी दिली. 

             जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांनी, सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून व गावागावात जनजागृती करून या आरोग्य मोहिमा शंभर टक्के यशस्वी कराव्यात, असे आवाहन केले.

             जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार आणि माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले.

सऺवाददाता  मुमताज अली सैय्यद 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes