Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

२० मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासन सतर्क....NN81


ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या संघटनेच्या आवाहनानुसार बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते औषध व्यवसाय बंद ठेवणार आहेत. ऑनलाईन इंटरनेट फार्मसीला विरोध आणि इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.

यासाठी दिनांक ८ मे रोजी जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. व्यापक जनहित लक्षात घेऊन बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून संघटनांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांना अत्यावश्यक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी तालुकानिहाय संपर्क व्यक्तींची यादीही तयार करण्यात येत आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क अधिकारी :

* श्री. अभिषेक चवरडोल, औषध निरीक्षक – ८८९७९४०९८१

* श्री. अतिश सरकाळे, सहायक आयुक्त (औषधे) – ९८९०१६५०१८

अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता गरज भासल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


  *संवाददाता* 

राजकुमार राऊत

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes