Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन :-NN81



         गोंदिया, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी एक महिना डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटिंग प्रशिक्षण कार्यक्रम तसेच क्लाऊड कॉम्प्युटिंग सर्व्हिसेस अॅन्ड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित दोन महिन्याच्या कालावधीचे तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

         सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की, प्रशिक्षित युवक व युवतींनी तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करावा किंवा तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा. तरी इच्छुक व्यक्तींनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया येथे प्रकल्प अधिकारी रोशन तायवाडे 9049939645/ 9168667183 यावर संपर्क साधावा किंवा एमसीईडीच्या गोंदिया संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.

         प्रशिक्षणासंबंधी विषयांचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे- उद्योग कसा सुरु करावा, शासकीय कर्जविषयक माहिती, अनुदान योजना, बाजारपेठ, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योग भेटी व कर्जप्रकरणे दाखल करण्याची माहिती दिली जाणार आहे.

         या प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी 18 ते 45 वयोगटातील असावा. अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. किमान दहावी शिक्षण झालेले असावे. गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 

          डिजिटल फोटोग्राफी व व्हिडिओ शुटिंग प्रशिक्षण कार्यक्रम तसेच क्लाऊड कॉम्प्युटिंग सर्व्हिसेस अॅन्ड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता किमान तंत्रनिकेतन कॉलेज, बी.एस.सी., एम.एम.सी. अभियांत्रिकीमध्ये पदवी असावी व स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्याची तयारी असावी.

         प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वत:चा जातीचा दाखला, अंतिम शैक्षणिक गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राणी अवंतीबाई चौक, सहयोग हॉस्पीटल जवळ, साई सुपर मार्केट पहिला मजला, एमसीईडी, गोंदिया येथे रोशन तायवाडे- 9168667183, शिशुपाल मानकर- 9130150017 यावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गोंदिया यांनी कळविले आहे. 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes