तळेगाव शा. प. येथील स्व. वत्सलाबाई गोहाड कनिष्ठ महाविद्यालयात आज २३ आँक्टोबर २०२५ ला दादी उर्फ स्व. वत्सलाबाई गोहाड यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत ताथोडे तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील भाऊ गोहाड प्रा. दिनेश नागलिया प्रा. हरिभाऊ बोहरुपी प्रा. संजीव पोटे शशी भाऊ वानखडे मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रथम प्रतिमेचे पुजन करण्यात आले. महाविद्यालयात प्राध्यापकांनी दादी च्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत ताथोडे यांनी दादी उर्फ वत्सलाबाई गोहाड यांचे अल्प शिक्षण असुन सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे ही आस्था होती. त्या बोरगाव ढुमणी गावातील पहिल्या महिला सरपंच तथा वर्धा जि. प. सदस्या म्हणून सुद्धा कामकाज केले. त्याच्या प्रेरणेतून तळेगाव सारख्या ग्रामीण भागात कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून हजारो विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाली. अशा या ग्रामीण भागातील धैर्यवान प्रतिभावंत दादी उर्फ स्व. वत्सलाबाई गोहाड यांच्या कार्याला नमन करतो. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता दोनल मनवर व कार्तिक नागफासे यांनी प्रयत्न केले.
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Advertisement
