डॉ. अजयकुमार शर्मा
पुणे जिला ब्यूरो,
न्यूज़ नेशन 81
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व देवाभाऊ फाउंडेशनचे मुख्य समन्वयक श्री. गजानन जोशी यांच्या आग्रहाने पुणे लोकसभा कार्यसमिती जाहीर
पुणे, दि. ३ :
देवाभाऊ फाउंडेशन महाराष्ट्र ही समाजहित, स्वावलंबन, उद्योजकता, आरोग्य, शिक्षण व संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व फाउंडेशनचे मुख्य समन्वयक श्री. गजानन जोशी यांच्या आग्रहाने पुणे लोकसभा कार्यसमितीची घोषणा करण्यात आली आहे.
या कार्यसमितीत समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असून समाजोपयोगी कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
पुणे लोकसभा समन्वयक श्री. विनीत बाजपेयी म्हणाले की –
"ही कार्यसमिती आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला गती देईल आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक वेगाने राबवले जातील."
सह-समन्वयक (संघटन) महाराष्ट्र डॉ. आशुतोष घोलप यांनी नमूद केले की –
"फाउंडेशन युवकांना सोबत घेऊन शिक्षण, सामाजिक बांधिलकी व उद्योजकतेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणार आहे."
या समितीच्या माध्यमातून पुणे लोकसभेत देवाभाऊ फाउंडेशनचे सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
